Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 25, 2014
Visits : 1901

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! वाटल होत निदान आता तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील पण नाही ! कदाचित आपल्या देशातील निसर्गाच्या लहरीपणालाच ते मान्य नसावं कदाचित. आपल्या देशातील शेतकर्‍यांना निसर्गाचा लहरीपणा काही नवीन नाही या पूर्वी ही कित्येकदा आपल्या देशातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाचा शिकार ठरलेला आहे पण हल्ली हे नित्याचेच झाल्या सारखे वाटू लागले आहे. या वेळी शेतकर्‍यांच्या शेतावर निसर्गाने गारपीटांचा मारा करत जो काही तासाभराचा लहरीपणा दाखविला तो शेतकर्‍यांनाही अनपेक्षीतच होता. तRead More

March 23, 2014
Visits : 2336

शून्य आता मी माझ्या वेदना, माझी दुःखे कोणालाच सांगत नाही कारण आता कोणी माझा उरलाच नाही... जगायचे ठराविले आहे जर मी फक्त स्वतःसाठी तर जगाची दुःखे गोंजारण्यात आता काही अर्थच उरलाच नाही... कोणाच्या प्रेमात पडण्यात आता मला किंचिंत ही रस नाही कारण आता कोणाचं प्रेम ठेवायला माझ्या हृद्यात मोकळा कप्पा उरलाच नाही... धावता- धावता जीवनात माझ्या इतका पुढे निघून गेलो की मागे वळून पाहता माझ्या मागे कोणी स्पर्धक उरलाच नाही... शून्याचा शोध घेण्यात माझे जीवन वाया गेले शून्याचा शोध लागला तेंव्हा माझ्या जीRead More

March 23, 2014
Visits : 1585

एकटाच... एकटाच काळही होतो, आजही आहे उद्या कदाचित नसेन मी... सारे आकाश काळ मोकळे होते, आजही मोकळे आहे उद्या कदाचित तसे ते नसेलही... एक स्वप्न, काळही होते, आजही आहे उद्याही कदाचित असेल ते मित्र काळ जे होते, आज ते नाहीत उद्याचे कोण ते माहीत नाही जीवन काळ्ही होते, आजही आहे उद्याही असणार आहे मी पतंग काळही उडत होतो, आजही उडत आहे उद्या कदाचित पडलेलो असेनही... कवी- निलेश बामणे.Read More

March 23, 2014
Visits : 7383

गारपीट ग्रस्त निसर्गाच्या लहरीपणाचा मला आता खरोखरच खुप राग आलाय त्याला जर गारपीटांचा मारा करायचाच होता तर तो निदान श्रीमंतांच्या मुंबईत तरी करायचा म्हणजे गरीब शेतकर्‍यांच्या आत्महत्या तरी टळ्ल्या असत्या... मुंबईकरांना काश्मिरात जाऊन आल्याचा आनंद घरबसल्याच मिळाला असता कोणालाच कोणाकडे मदतीसाठी मदतीचा हात मागावाच लागला नसता... ऐन निवडणूकीत राजकारण्यांच्या डोक्याला ताप झालाच नसता खोट्या आसवांचा आणि आश्वासनांचा बाजार मांडला गेलाच नसता... प्रसारमाध्यमांनी विनाकारण तिच ती दृष्ये पुन्हा-पुन्हा दRead More

March 15, 2014
Visits : 4123


March 15, 2014
Visits : 6267

होळी आजकाल होळीला मी तिच्या आठवणींच्या रंगा व्यतिरीक्त दुसर्‍या रंगात रंगत नाही तिने तिच्या प्रेमाने माझ्या चेहर्‍यावर चढविलेला रंग आजही कशाने फुसला जात नाही त्या रंगावर आता कोणीही कितीही प्रेमाणे रंग लावला तरी तो आता चढतच नाही. का कोणास जाणे आता मला निसर्गातील कोणत्याच रंगाबद्दल आकर्षण वाटत नाही. आता होळी रे होळी ! ओरडत कोणावर प्रेमाने पाणी ओतावे असे मनापासून वाटतच नाही. रंगात रंगून विद्रूप झालेल्या पण तरीही उत्साही दिसणार्‍या चेहर्‍यांकडे हल्ली पाहवतच नाही. होळीला मी हल्ली कोणाच्याही आगRead More

March 10, 2014
Visits : 2154

मोठेपण लहान असतानाच मी झालो होतो इतका मोठा की आता मला लहान होताच येत नाही... कोणासमोरही माझ्या मनात असतानाही स्वतःहून विनाकारण झुकता येत नाही. कोणासमोरही कोणत्याच मदतीच्या अपेक्षेने कोणासाठी ही हात पसरता येत नाही. कोणालाही मदत करताना माझा हात मला आकडता ही हल्ली घेता येत नाही. मोठेपण मिळविण्याच्या व्यसनातून मला आता बाहेरच पडता येत नाही. मोठेपणाचे ओझे आता माझ्या शिरावर वाहण्याखेरीज माझ्याकडे पर्याय नाही. कवी- निलेश बामणे.Read More

March 08, 2014
Visits : 10085

जागतिक महिला दिन झालाही असेल कदाचित जन्म एका स्त्रिचा पुरूषापासून पण विश्वातील तो एक पुरूष सोडला तर समग्र पुरूष जातीला जन्म स्त्रियांनीच दिला... स्त्रिला जन्म देताना पुरूषाला वेदना झाल्या असतील – नसतील ही पण पुरूषांना जन्म देताना स्त्रियांना होणार्‍या वेदना पुरूष वर्षानुवर्षे पाहतच आला... स्त्रियांनी पुरूषांना फक्त जन्मच दिला नाही तर खायला दाणा, राहायला आसरा, प्रेम, जिव्हाळा आणि संस्कारही दिला... पुरूषांनी स्त्रियांना आपल्या मनात, हृद्यात आणि प्रसंगी देव्हार्‍यातही बसविला पण आपल्या बरोबRead More

March 06, 2014
Visits : 26223

बसस्टॉप ( एक दीर्घ कथा ) लेखक – निलेश बामणे ‘’जवळपास वर्षभर हा माझ्या मागे लागलाय, नचूकता मी यायच्या वेळेवर रोज बस्टॉपवर माझी वाट पाहत उभा असलेला दिसतो. मी बसमध्ये चढले की माझ्या मागून चढातो, मी बस सोडली की तो ही सोडतो, माझ्या गोर्याी रंगावर आणि मादक शरिरावर भुळ्लाय आणि काय ? मी चुकून त्याच्या नजरेला नजर दिली तर मुलींसारखी नजर चोरतो. बसमध्ये माझ्या बाजुला येऊन उभा राहिला तर मला त्याचा धक्का लागून मी त्याला काही बोलणार नाही याची पूर्ण काळ्जी घेतो.Read More

March 01, 2014
Visits : 1347

फॅंड्री– एक सामाजिक चित्रपट लेखक – निलेश बामणे. फॅंड्री चित्रपटाच्या सुरूवातीलाच उडणारी एक काळी चिमणी म्ह्णजे आजही समाजात जाती- भेद मुक्तपणे संचार करतोय हे दर्शविण्याचा तर प्रयत्न नव्हता ना ? फॅंड्री चित्रपट पाहणे बर्‍याच दिवसापासून मनात होते पण तो पाह्ण्याचा योग काही येत नव्हता. तो योग शेवटी एकदाचा आला मी माझ्या दोन जिवलग मित्रांसोबत तो चित्रपट पाहिला. खास वेळ काढून आंम्ही तो चित्रपट पाहायला गेलो होतो. मी स्वतः एखादा चित्रपट पाहायला जातRead More

March 01, 2014
Visits : 2317

नाही म्ह्णून पाहू ! लेखक – निलेश बामणे आपल्याला बर्‍याचदा आपण फक्त होकारात्मक विचारच करायला ह्वा अशी शिकवण दिलेली असते. सतत नकारात्मक विचार केल्याने आयुष्यात नकारात्मक गोष्टीच घडतात या विचारसरणीचा आपल्यावर पगडा आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे असं नाही म्ह्णता येणार पण पूर्णपणे बरोबरच आहे असंही नाही म्ह्णता येत कारण प्रेमात नकार मिळालेल्यांला आपण बर्‍याचदा काय सांगत असतो की माणसाला प्रेमात नकार पचवता यायला हवा ! आपल्याला एखादी गोष्ट कोणी करायला सांगितली आणि ती गोष्ट आपल्यRead More

March 01, 2014
Visits : 1697

वर्गणी लेखक – निलेश बामणे. वर्गणी हे शब्द कानी पडताच हल्ली लोकांच्या हृद्याचे ठोके चुकतात. वर्गणी कोणाकडूनही कशासाठीही जमा करायला जाणे आंम्हाला कधी जमलेच नाही कारण लहानपणापासून घाम गाळूनच पैसे मिळविण्याची आंम्हाला सवयच जडली होती. वर्गणी देताना आंम्ही पूर्वी हात आकडता घेत नव्ह्तो पण हल्ली वर्गणी मागणारे हात वाढल्यामुळे विचार करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी आंम्ही एका कारखान्यात घाम गाळ्त होतो आमचच काम होत म्ह्णून. त्यादरम्यान त्या कारखान्यात कोणत्यातरी उत्सवाRead More

March 01, 2014
Visits : 3219

प्रियकर हृद्यस्पर्शी चित्रपट पाहताना जर प्रियकराच्या डोळ्यात अश्रू आले तर प्रेयसीने समजून जावं तो हळ्वा आहे, त्याच्या हृद्यात कोठेतरी ओलावा आहे, तो तिच्यापूर्वी ही कोणाच्यातरी प्रेमात पडलेला आहे आणि पडलेला नसेल तर भविष्यात पडणार आहे... अशा प्रियकराला जपणे फार अवघड असते. त्यांच्या हृद्यातील वेदना कधीच ओठावर येत नाहीत तर त्या नेहमीच डोळ्यातील अश्रूंच्या रूपात बाहेर पडत असतात त्यामुळे त्यावेळी त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू जी आपल्या नाजूक बोटावर टिपते तो तिच्याच प्रेमात पडत असतो नव्याने...Read More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 70637 hits