Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक २०१७

October 11, 2017

Search by Tags:  लेख
साहित्य उपेक्षितांचे मासिकाचा दीपावली विशेषांक २०१७ अवघ्या ३६ पानांचा आहे पण तो वाचायला कोणी सुरुवात केली तर संपूर्ण वाचल्याखेरीज खाली ठेवणार नाही याची आम्हाला खात्री आहे या अंकात मला ६५ लेखकांना संधी द्यावीच लागणार होती कारण मी त्यांना प्रत्यक्ष फोन करून त्यांच्याही बोललो होतो आणि त्यांना या अंकासाठी कोणतेही मानधन मिळणार नाही असे स्पष्ट संगीतल्यावरही उत्साहाने तीन - तीन कविता कथा त्यांनी पाठविल्या. त्यामुळे सर्वाना संधी देणे क्रमप्राप्त होते तरी शेवटी शेवटी काहींची संधी हुकली त्याला माझा नाईलाज होता. आठ लेखकांना आणि सत्तावन कवींना संधी देण्यासाठी प्रत्येकाची फक्त एक साहित्यकृती प्रकाशित केली. अंकात सुरुवातीलाच आमच्या मासिकाचे सल्लागार संपादक माझे मित्र गुरू आणि बंधू डॉ. शांताराम कारंडे यांचा "तरच अच्छे दिन येऊ शकतील" हा अभ्यासपूर्ण लेख आहे ज्यात त्यांनी आदरणीय मोदींवर टीका नाही केली तर एक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या मासिकाचे उपसंपादक अशोक कुमावत हे उत्तम कथा लेखक आहेत पण यावेळी आम्हाला त्यांच्या नियोजित कथेला बगल द्यावी लागली आणि त्याऐवजी त्यांचा पंढरपूरला भेट दिल्यानंतर विठ्ठल दर्शनाने भारावून त्यांनी जो लेख लिहला तो येथे प्रकाशित केलेला आहे. त्यांनतर सोनाली टोपले या उत्तम कविता लिहतात पण आम्ही त्यांची " तोच चंद्रमा नभात "ही प्रेमकथा प्रकाशित केली आहे, ही कथा त्यांनी नंतर अधिक विस्तारित केली पण आम्हाला ती प्रकाशित करणे शक्य नव्हते.मिलिंद कल्याणकर सर आमच्या मासिकासाठी सातत्याने साहित्य पाठवीत असतात पण त्यांच्या कवितेला बगल देत आम्ही त्यांचा " त्याच्या नजरेतून ती " हा लेख प्रकाशित केला. या लेखात त्यांनी पुरुषांचा आधुनिक स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. प्रदिप बडदे नवोदित लेखक पण साहित्य सेवेसाठी सतत धडपडत असतात त्यांची "अनामिक" ही उत्तम जुळली आहे स्त्री - पुरुष संबंधावर त्यांनी उत्तम भाष्य केले आहे त्यांचेच बंधू जे व्यवसायाने वकील आहेत आणि अनेक सामाजिक उपक्रमात ज्यांचा सहभाग असतो असे ऍड. शंकर बडदे यांचा तुरुंगवास या विषयावरील अप्रतिम लेख प्रकाशित केलेला आहे. त्यांनतर आबासाहेब घावटे यांची एक नाटिका प्रकाशित केली आहे जी शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करते त्यांचा प्रयत्न उत्तम रंगला आहे आम्ही आमच्या परीने त्यांच्या प्रयत्नाला हातभार लावला इतकंच ! अंकाच्या शेवटी शोभना कारंथ यांची "जाणीव" ही कथा प्रकाशित केली आहे पण ही कथा घ्यायचीच हे वाचताक्षणीच निश्चित झाले होते कारण माणसातील माणूस जागा करणारी ही कथा आहे हा अंक प्रकाशित करण्याचा आमचा उद्देश्य ही कथा सार्थकी करते आणि अंक वाचून खाली ठेवण्यापूर्वी नक्कीच विचार करायला भाग पाडते. आमच्या या विशेषांकाचे मूल्य ५० /- रुपये इतरांच्या तुलनेत जास्तच आहे अंक विकत घेऊनच वाचा असा आमचा आग्रह नाही कारण काही दिवसांनंतर आम्ही तो सार्वजनिक करणारच आहोत. मी या मासिकाचा संपादक असतानाही मला माझी शेवटी एक छोटी कविता प्रकाशित करावी लागली "झोपडी ते टॉवर " मी बरा कथा लेखक असतानाही माझी कथा यावेळी प्रकाशित नाही करता आली याची खंत नाही आनंद आहे कारण माझ्या अंकात मी माझेच साहित्य प्रकाशित करतो असे काहीजण टीका करत असतात. आमच्या अंकाला काहीही ओळख नसतानाही भरभरून कविता पाठविणाऱ्या माझ्या ५७ साहित्यिक कवी मित्रांचे आणि मैत्रिणीचे आभार मानतो .

- निलेश बामणे ( संपादक )
Search by Tags:  लेख
Top

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 1206 hits