Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मला कळतेय...

October 05, 2017

Search by Tags:  कविता
मला कळतेय...
मला कळतेय तुझी घालमेल
पण अर्थ लागत नाही...
उगाच अर्थाचा अनर्थ नको
म्हणून मी बोलत नाही...
तुझे वागणे सारेच गूढ
त्याचा अर्थ लागत नाही
मी हिंमत करावी म्हणतो
पण खात्री वाटत नाही...
तुझे सारेच विचित्र आहे
काहीच अर्थबोध होत नाही
माझ्या अबोल्याचा अर्थ ही
कधी तुला कळत नाही...
मला कळतेय व्यक्त व्हावे
पण हिंमत होत नाही
माझ्याजवळ आता गमवायला फक्त
अब्रुशिवाय त्या काहीही नाही...
माझे तुझ्यावर प्रेम आहे
याबद्दल आता शंका नाही
प्रेमात पुढाकार तूच घ्यावा
त्याला आता पर्याय नाही...

©कवी - निलेश बामणे
Search by Tags:  कविता
Top

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 1443 hits